Kivle : पवना नदीवरील महादेव घाटावर मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज – पवना नदीवर किवळे येथे महादेव घाटावर सतरा वर्षीय ( Kivle) मुलगा बुडाला. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी घडली. बुडालेल्या मुलाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला.

तुषार नरेश जाधव (वय 17, रा. भोसरी) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

Chinchwad : मतदार यादीतील नाव शोधणे कामी Voters Help Desk ची स्थापना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार जाधव हा बुधवारी मित्रांसोबत किवळे येथील महादेव घाटावर गेला. पवना नदीत पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. बुधवारी सायंकाळी शोधकार्य सुरु झाले. मात्र पाण्याचा खळखळाट फार असल्याने तसेच अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले.

गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात आली. गुरुवारी राबवलेल्या शोधमोहिमेत मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तुषारचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ( Kivle) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.