Shirur Lok Sabha Election: ओझर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा भाजपा प्रवेश
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या समन्वयाने आणि राज्याचे (Shirur Lok Sabha Election)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश कवडे यांनी हातात ‘कमळ’ घेतले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची शिरुरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत कवडे यांनी भाजपाची पताका खांद्यावर घेतली.
याबाबत आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र ओझर विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी आज राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे.
Mahalunge: टँकरच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू
अष्टविनायक गणपतीपैकी ओझरचा विघ्नेश्वर, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज आणि रांजनगावचा महागणपती ही तीर्थक्षेत्र शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आहेत. पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक गणपतीपैकी विघ्नेश्वर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गणेश कवडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा महायुतीला होईल, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.