Bhosari : तडीपार गुंडाची दहशत, मारहाण करून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज – तडीपार केलेल्या गुंडाने शहरात येऊन दहशत निर्माण केली. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री दहा वाजता महात्मा फुले नगर झोपडपट्टी,भोसरी येथे घडली.

 

दीपक शशिकांत पवार (वय 24, रा. ओटास्कीम, निगडी) असे दहशत माजविणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रोहन सचिन गुजर (वय 19, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुजर हे रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास महात्मा फुलेनगर झोपडपट्टी येथे थांबले असताना आरोपीने त्यांना बोलावून घेतले. त्यांनतर त्यांना मारहाण व शिवीगाळ करून नखाने(Bhosari) ओरखडले. गुजर यांच्या खिशातून जबरदस्तीने आरोपीने 400 रुपये काढून घेतले.

त्यानंतर आरोपीने लाकडी बांबू हातात घेऊन हवेत फिरवत लोकांना मारण्याची(Bhosari) धमकी देत दहशत निर्माण केली. त्याला घाबरून लोक पळून गेले.  भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.