Mahalunge: टँकरच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका (Mahalunge)व्यक्तीला भरधाव टँकरने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर लांडगेवस्ती येथे घडला.
भीमराव रामराव राठोड (वय 35, रा. लांडगेवस्ती, आंबेठाण) असे मृत्यू झालेल्या (Mahalunge)व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भीमराव यांच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर चालक प्रवीण सोमनाथ तुपे (रा. महाळुंगे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती भीमराव हे महाळुंगे ते आंबेठाण रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात भीमराव यांच्या हाताला, डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.