Khed: गांजा विक्रीप्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. तिच्यासह तिच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे करण्यात आली.

 

पोलिसांनी खालूंब्रे येथील 54 वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यासह तिचा साथीदार विशाल घोजगे (रा. कान्हेफाटा, वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला(Khed) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “खेड तालुक्यातील खालूंब्रे येथे एक महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातील एक लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा तीन किलो 810 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे”.

आरोपी महिलेने हा गांजा कान्हे फाटा, वडगाव मावळ येथील विशाल घोजगे याच्याकडून आणला असल्याचे तपासात सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विशाल घोजगे विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.