Hinjewadi: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई (Hinjewadi)रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे हिंजवडी पोलिसांनी केली.

अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे (Hinjewadi)(वय 29, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कांबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : शहरात स्वतंत्र उद्योगभवन उभारण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी अक्षय हुलावळे याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. त्याने स्वतःजवळ कोयता हे शस्त्र बाळगले.

याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून अक्षय हुलावळे याला शस्त्रासह अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.