Dehu: देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, चोर महिलेला अटक

एमपीसी न्यूज – देहुगाव येथील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात महिलेच्या गळ्यातील(Dehu) मंगळसुत्र चोरण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी घडली.याप्रकऱणी पोलिसांनी चोर महिलेला अटक केली आहे.

पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी 35 वर्षीय (Dehu)जालन्याती एका महिलेला अटक केली आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तुकोबारायांच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. मंदिराच्या मुख्य मंडपातील गर्दीचा फाय़दा घेलून आरोपी महिलेने फिर्यादी महिलेचे 7 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र देवाच्या दारात चोरी होत नाही म्हणतात त्याप्रमाणा आरोपी महिलेला तात्काळ पकडण्यात आले.

देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.