Thergaon : केंद्र सरकारच्या पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेंतर्गत महापालिकेच्या थेरगाव महाविद्यालयाची निवड

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजने(Thergaon)अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाली आहे. असा बहुमान मिळविणारी ही शहरातील एकमेव शाळा ठरली आहे.

 

त्यामुळे, महापालिका शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे. पाच वर्षांसाठी शाळेला एक कोटी 88 लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ ठरणार आहे.

पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत, दुसऱ्या (Thergaon)टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 15 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार आहे. या शाळांत ‘आयसीटी लॅब’, ‘डिजिटल लायब्ररी’, ‘स्मार्ट क्लासरूम्स’, ‘स्टेम लॅब’, ‘टिंकरिंग लॅब’ तयार करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे. पीएमश्री शाळा’ योजने अंतर्गत थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहायक आयुक्त विजय कुमार थोरात, शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

पीएमश्री शाळेची वैशिष्ट्ये…

– ‘पीएम श्री’ च्या शाळा या आदर्श विद्यालये म्हणजेच मॉडेल स्कूल असतील.

– राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी पूर्णपणे (एनईपी) सुसंगत असतील.

– शाळांचे पूर्णपणे आधुनिकीकरण होणार.

– पायाभूत सुविधांनुसार इमारतींचीही सुधारणा.

– स्मार्ट क्लासरूम, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.

– एनईपी अंतर्गत ‘प्ले स्कूल’चाही समावेश.

– इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचे वर्ग शिकवले जाणार.

– या शाळांसाठी एकूण 60 मानके निश्चित.

विविधांगी प्रयोगांची रेलचेल, खेळही या शाळांमध्ये अधिकाधिक प्रायोगिक, परिवर्तनात्मक सर्वांगीण विकास आणि एकात्मिक पद्धती (ज्यात सर्व प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटींचा समावेश) शिकविण्यासाठी आणि शिकण्यासाठी अवलंबल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये ‘डिस्कव्हरी ओरिएंटेड’ आणि ‘लर्निंग सेंट्रिक टीचिंग मेथड’ राबविण्यात येणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची आणि शोधण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होईल, अशा पद्धतीने ते शिकवले जाईल. खेळ आणि खेळण्यांवर आधारित अध्यापन केले जाईल. त्यात, लोकप्रिय खेळांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

थेरगाव विद्यालयाच्या या कामगिरीमध्ये दुपार सत्र-पर्यवेक्षिका सुनिता ताम्हाणे, सकाळ सत्र पर्यवेक्षिका हर्षदा राऊत तसेच शुभदा ताठे, मंजुषा टिकेकर, रुपाली गाथा, मंगला आव्हाड, सोनाली जाधव, सायखेडे माधुरी, सुप्रिया तुपे, नामदेव कोकणे, उदयकुमार बनसोडे, सावंत विद्यानंद, मोहन भोये,  सुनील तायडे, इस्माईल मुल्ला, रेखा कुराडे, नितीन गाडे,श्री लोंढे आनंदा, सुदाम दुर्वे, देविदास जगताप, अनिता सोनवणे या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले.

प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी 88 लाख

ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून, या अंतर्गत निवड झालेल्या शाळा आदर्श शाळांत रूपांतरित होणार आहेत. या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून, राज्य सरकारचा हिस्सा 40 टक्के आहे. यासाठी राज्य सरकार प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी 88 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

Pimpri : पिंपरी कॅम्पला लवकरच गावठाणाचा दर्जा – खासदार श्रीरंग बारणे

केंद्र सरकारच्या सहकार्याने आदर्श शाळा विकसित होतील

‘‘पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित होतील. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.’’
बाबासाहेब राठोड,
मुख्याध्यापक,
थेरगाव माध्यमिक विद्यालय

https://www.youtube.com/shorts/klJmRFVVFhQ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.