Talegaon Dabhade : कातवी गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज – कातवी गावचे ग्रामदैवत श्री हनुमान आणि विठ्ठल रखुमाई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा(Talegaon Dabhade) सोमवारी (दि. 18) उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हभप गुलाब महाराज कुंभार यांचे यानिमित्त कीर्तन झाले. “बरवी हे वेळ सांपडली संधि । साह्य झाली बुद्धि संचितासी” हा अभंग गुलाब महाराज कुंभार यांनी कीर्तन सेवेसाठी घेतला होता.
याप्रसंगी तळेगावचे उद्योजक शंकरराव शेळके, मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,(Talegaon Dabhade) श्री पोटोबा महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, हभप नंदकुमार भसे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी सरपंच पंढरीनाथ ढोरे,माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे,मावळ मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर,पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे,माजी सरपंच संभाजी म्हाळसकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलवडे, माजी नगरसेवक रवींद्र म्हाळसकर,माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर,विश्वस्त सुनिता कुडे, वैशाली ढोरे,तसेच पंचक्रोशीतील वारकरी,भजनकरी आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

पहाटे हनुमान मंदिरामध्ये 5 ते 7 वा काकडा आरती व महाअभिषेक करण्यातआला. दु. 2 ते 3 वा. यशवंत महिला भजनी मंडळ,कातवी यांचे भजन झाले.दु. 3 वा. यशवंत भजनी मंडळ,कातवी यांचे भजन झाले.सायंकाळी 6 ते 7 वा.हरिपाठ झाला.सांय 7 ते 9 वा. वाणीभुषण ह.भ.प. गुलाब महाराज कुंभार यांचे किर्तन झाले. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कुंभार महाराज म्हणाले की नाम चिंतनासाठी  “ही वेळ फार चांगली आहे, कारण संचिताला सद्बुद्धी साहाय्य झाली. आणि त्यामुळेच
भक्तिपंथाने, अर्थात चांगल्या मार्गावर मनुष्य चालत राहतो.,आणि संतांचे दर्शन घडते व पूर्वीचे दारिद्र व दोष निघून जातात आणि त्याच वेळी देह पवित्र होतो.आज जन्म-मरणाच्या येरझारांचे सार्थक होते. आणी सर्व साधना फलद्रूप होतात असेही महाराज यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व यशवंत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेत उत्तम नियोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.