Raj Thakrey : राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – मनसे पक्ष आता  राज्याच्या महायुतीमध्ये  सामील होण्याच्या ( Raj Thakrey ) मार्गावर आहे.  राज ठाकरे  यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह  यांची भेट घेतली. या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा  झाल्याची माहिती आहे.त्यामुळे आता भाजप-मनसे युती केव्हा होणार  याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Khed: लग्नाला नकार दिला म्हणून दोघांना बेदम मारहाण 

राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात ( Raj Thakrey ) येतेय. तसेच मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.