Khed: लग्नाला नकार दिला म्हणून दोघांना बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज –  लग्नासाठी मुलीचा हात मागितला असता त्याला (Khed)नकार दिला म्हणून तीन ते चार जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.17) रासेगाव खेड येथे घडली आहे.
याप्रकरणी कमल तुकाराम गावडे (वय 25 रा. कान्हेसर,खेड) यांनी चाकण पोलीस (Khed)ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून किरण ठाकर व धीरज व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला व भेटण्यास बोलावले.यावेळी धीरज याने फिर्यादी च्या ओळखीच्या मुलीसाठी लग्नाची मागणी केली. यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्राने नकार दिला असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.यात ते जखमी झाले. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.