Chakan : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 224 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज  – सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने  पुणे झोनची ( Chakan) चाकण  शाखा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी दिनांक 17 मार्च  रोजी विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 224 निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. निरंकारी भक्तांबरोबर अनेक सज्जनांनीही या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. यशवंतराव चव्हाण रक्तपेढीच्या डॉ. मोसलगी यांच्या टीमने 224 युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.

Chinchwad : भोसरीमधील उजगरे, वाकडमधील आहिरराव टोळयांवर मोका

 

शिबिरादरम्यान अनेक मान्यवरांनी  सदिच्छा भेट देऊन  मिशनच्या कार्याचे कौतुक केले आणि मिशनच्या सामाजिक योगदानासाठी  शुभेच्छा दिल्या.    संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे 1986 मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते.

त्यावेळी निरंकारी बाबा हरदेव सिंहजीं महाराज यांनी मानवतेला संदेश दिला की “रक्त नाल्यांमध्ये नाही तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे”.
संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे चालू ठेवला आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक नरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल आणि निरंकारी मिशनचे अनुयायी यांचे  योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार चाकण  शाखेचे प्रमुख  मधुकर गोसावी ( Chakan)  यांनी व्यक्त केले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.