Wakad : महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा गजाआड

एमपीसी न्यूज – फुटपाथवर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ( Wakad ) तब्बल लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी हिसकावले आहे. ही चोरी रविवारी (दि.17) वाकड येथील कावेरी नगर क्रीडा संकुल येथे घडली आहे.
याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी तपास करत आदेश रतन काळे (वय 20 रा. थेरगाव मूळ रांजणगाव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या मंदिरा ध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. तेथून त्या फुटपाथवर आपल्या मुलीची वाट बघत असताना आरोपी पाठीमागून आला व त्याने फिर्यदीच्या गळ्यातील 1 लाख 28 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत ( Wakad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.