Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

एमपीसी न्यूज – घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे ( Mahalunge ) दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत महाळुंगे येथे घडला.

तुषार रामदास शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या एजंटचे नाव आहे. याप्रकरणी जयदीप सुदाम गोगावले (वय 24, रा. निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mahalunge : दुचाकीला उडवून कंटेनर चालक पसार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोगावले यांना घर बांधण्यासाठी कर्ज रकमेची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी व्हीराईज फायनान्सचा एजंट तुषार शिंदे याच्यामार्फत एक लाख 66 हजार 500 रुपये कर्ज घेतले. हे कर्ज सन 2023 मध्ये घेतले होते. ते कर्ज क्लोज करण्यासाठी तसेच एनओसी देण्यासाठी गोगावले यांनी एजंट तुषार शिंदे याने दिलेल्या नंबरवर कर्ज रक्कम पाठवली. ती रक्कम तुषार शिंदे याने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. तसेच गोगावले यांना कर्जाची एनओसी न देता त्यांची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत ( Mahalunge ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.