Moshi : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून एका ( Moshi) तरुणाला अटक केली. हा तरुण गांजा विक्री करत होता. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी संजय गांधी नगर समाज मंदिरा शेजारी मोशी येथे करण्यात आली.

कृष्णा शामसुंदर शिंदे (वय 19, रा. मोशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी मधील संजय गांधी नगर समाज मंदिरा शेजारी एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कृष्णा शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 530 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि मोबाईल फोन असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Moshi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.