Mahalunge : दुचाकीला उडवून कंटेनर चालक पसार 

एमपीसी न्यूज – भरधाव कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून धडक ( Mahalunge ) दिली. त्यानंतर कंटेनर चालक पसार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली. 

प्रदीप तुकाराम जाधव (वय 55, रा. वाघोली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच 06/एक्यू 8471) चालक पिंटू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amazon : ॲमेझॉनच्या मदतीमुळे लघु व्यावसायिक बनले कोट्याधीश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप जाधव हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते भांबोली येथे पेट्रोल पंपासमोर आले असता भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये जाधव यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच छातीत मुक्कामार लागला. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास ( Mahalunge ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.