Chinchwad : लोकसभा निवडणुकीसाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार (Chinchwad)संघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान होणार आहे.  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 407 मतदान केंद्रे तर 1 हजार 787 बूथ आहेत. त्यासाठी आयुक्तालयाची पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून तब्बल सहा हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी तब्बल तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर ३३ पिस्तुलांसह 111 हत्यारे जप्त केली आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन(Chinchwad) तसेच मोठ्या प्रमाणात प्रतीबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सहा हजार पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे.

यामध्ये पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यांसह सहा उपायुक्त, 11 सहायक पोलीस आयुक्त, 325 अधिकारी (पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक), 4 हजार अंमलदार, 1500 होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची सहा पथकांचा समावेश आहे. यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहराबाहेरून मागवण्यात आला आहे. दहा महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांची विशेष पथकेही शहरात गस्तीवर असणार आहेत. गर्दी होणाऱ्या किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या केंद्रांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे.

तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार आचारसंहिता लागल्यापासून (16 मार्च) तब्बल तीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात एमपीडीए तर सहा मोका कारवाईमध्ये 28 सराईतांना जेरबंद करण्यात आले आहे. 101 आरोपींकडून 111 शास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर 33 आरोपींकडून 33 पिस्तुलांसह 47 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थ तस्करांवरही कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला असून 52 लाख 62 हजार रुपये किमतीचे 1 लाख 65 हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. तसेच 56 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर निवडणुकीपूर्वी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संयुक्तपणे मोठे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे.

नाकाबंदीत कोट्यवधींचे घबाड

पोलीस आणि निवडणूक आयोगातर्फे संयुक्तपणे कारवाई केली जात आहे. फिक्स पॉईंटसह ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नाकाबंधित पोलिसांनी एक कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली आहे. तर दीड कोटी रुपये किमतीचे 2 किलो 74 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.