Pune : माजी नगर संघचालक नाना कचरे यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वानवडी भागाचे माजी संघचालक, जनसेवा सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ म्हस्कूजी तथा नाना कचरे (वय 88) यांचे आज (दि.27 एप्रिल) वर्धापकाळाने राहत्या घरी वानवडी(Pune) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, जावई व नातवंडे आहेत.

 

आज (दि.27 एप्रिल) रोजी संध्याकाळी अंत्यसंस्कार वानवडी स्मशानभूमीत झाले, त्यावेळी  संघाचे महेश करपे, प्रसाद लवळेकर, विश्व हिंदू परिषदेचे पांडुरंग राऊत, जनसेवा बँकेचे रवी तुपे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार योगेश टिळेकर,राजेंद्र वालेकर(Pune) तसेच अनेक नगरसेवक, बँक कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.

Pune : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

पुण्याच्या पूर्व भागात रा. स्व. संघाचे काम उभे करण्यात नानांचा उल्लेखनीय वाटा होता. वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा या भागात संघ कामाबरोबरच, जनसंघाच्या कामात देखील ते प्रचंड सक्रीय होते. 1972 मध्ये हडपसर येथे जनसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. सहकार भारतीच्या स्थापनेपासूनच्या कार्यात 1978 पासून ते सहभागी होते .त्यांनी सहकार चळवळीत देखील भरीव काम केले. अपंग कल्याणकारी संस्था, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना,जनसेवा न्यास या सर्व संस्थांच्या उभारणीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यांच्या जाण्याने वानवडी भागात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.