Today’s Horoscope 28 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 28 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 28.04.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 04.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मूळ नक्षत्र.

चंद्र राशी – धनु

—————————–

मेष  ( शुभ रंग- पांढरा)

नोकरी उद्योगात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येऊ शकते. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तो टाळा. झटपट लाभाचा मोहही टाळायला हवा. संयम गरजेचा राहील.

वृषभ (शुभ रंग- भगवा )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकलले तर बरे होईल. ज्येष्ठांना सत्संगाकडे पावले वळवावी लागणार आहेत.

मिथुन (शुभ रंग – लाल)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात सुसंवाद महत्त्वाचा राहील.

कर्क ( शुभ रंग- डाळिंबी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांची शाबासकी मिळवतील. आज तब्येत थोडी नरमच असेल. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गप्पच राहणे हिताचे.

सिंह ( शुभ रंग- हिरवा)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

कन्या (शुभ रंग- मरून)

व्यापार उद्योगाला पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज स्थावराचे व्यवहार लाभ देतील. आईने दिलेले सल्ले महत्त्वपूर्ण असणार आहेत.

तूळ (शुभ रंग- निळा)

आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. तरुणांनी कुसंगती पासून दूर राहावे. व्यसने टाळावीत.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी)

धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही आज गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे.

धनु (शुभ रंग- जांभळा)

तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचाही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होईल. सतर्क रहा.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा.

मीन ( शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्या.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.