Photo Feature : गणेशाच्या आणि रामाच्या नामघोषाने दुमदुमले पुणे; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पहा खास क्षणचित्रे

एमपीसी न्यूज – जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय (Photo Feature) श्रीरामच्या नामघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune) सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. या सोहळ्याची खास क्षणचित्रे पहा एमपीसी न्यूजवर –