Online Cheating : सर्वात मोठी सायबर फसवणुक; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात नाव असल्याचे सांगत उच्चशिक्षित महिलेला 25 कोटींचा गंडा

एमपीसी न्यूज – मनी लॉन्ड्री प्रकरणात नाव असल्याचे सांगत बहुराष्ट्रीय कंपनीतून निवृत्त झालेल्या ( Online Cheating) संचालक महिलेला 25 कोटींचा गंडा घालण्यात आला. महिलेने स्वतःच्या आणि आपल्या आईच्या नावावरील शेअर्स विकून आरोपींना पैसे दिले आहेत. सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक असल्याने पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.

हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून मुंबई पश्चिम उपनगरात घडला. याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी महिला बहुराष्ट्रीय कंपनीतून संचालक पदावरून निवृत्त झाली आहे. या महिलेला अनोळखी लोकांनी फोन करून त्यांचे नाव मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या ( Online Cheating) महिलेने स्वतःची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी स्वतःच्या आणि आईच्या नावावरील शेअर्स विकून पैशांची व्यवस्था केली.

Loksabha Election 2024 : राज्यात दुसरा टप्प्यात 62.71 टक्के मतदान; मागील वेळेपेक्षा कमी मतदान 

दरम्यान सायबर चोरट्यांनी महिलेच्या नावानेच बँकेत करंट अकाउंट उघडले. त्या खात्यात महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने शेअर्स विकून आलेले पैसे तिच्याच नावाने असलेल्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी ते पैसे विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.

सायबर चोरट्यांनी महिलेला सांगितल्यानुसार, महिलेने पैसे जमा केल्यानंतर ते पैसे रिझर्व बँकेकडे जमा केले जाणार आहेत. ते पैसे महिलेला काही दिवसानंतर परत देखील मिळणार होते. मात्र तब्बल 25 कोटी रुपये पाठवल्यानंतर देखील आपले पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाशी संबंधित 31 बँक खाती गोठविण्यात आली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक असल्याने पोलिसांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घातले ( Online Cheating) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.