Pune : पाकिस्तानकडे ओढा कोणाचा ? काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा सवाल 

एमपीसी न्यूज – मोदी, शहा फडणवीस काँग्रेस नेत्यांविषयी असत्य, तर्कहीन व बदनामीकारक ( Pune) जाहीराती प्रदर्शीत करून, काँग्रेस नेत्या इंदीराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देशाची निर्मिती केली, अशा काँग्रेसचा विजय झाल्यास पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव होईल  अशा पोरकट, बालीश व हास्यस्पद जाहीराती देत आहेत. उलट पक्षी मोदी काळातील आज पर्यंतच्या घटना पाहता ‘मोदी प्रणीत भाजप’चाच’ पाकिस्तानकडे ओढा असल्याचे पदोपदी जाणवत असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. डीआरडीओचे संचालक व संघाची पार्श्वभूमि असलेले प्रदीप कुरुलकर यांना ब्रम्होस क्षेपणास्त्रें इ. संशोधना बाबतची माहीती पाकला पुरवली हे उघड होऊन देखील  त्यांचे पुढे काय झाले  ? त्यांचेवर देशद्रोहाचा खटला सरकार कधी चालवणार..? असा संतप्त सवाल राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. 
तसेच, मोदी सरकारचे काळातच अतिरेकी हल्ला प्रकरणी पठाणकोटमध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेस जाण्याची अजब परवानगी मोदी सरकारने दिली. ही देखील गंभीर आक्षेपार्ह बाब होती,  नोट बंदीचे कारण हे ‘अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी आहे’ असे सांगितले, मात्र नोट बंदी नंतर लोक पेटीएम समोर लाईन लावत होते. मात्र त्याच वेळी महीना भराचे आत अतिरेक्यांकडे 2, 000 च्या नव्या लाल नोटा सापडल्या हे कशाचे द्योतक आहे..? त्याची चौकशी का केली गेली नाही..?

बिन बुलाये मेहमान प्रमाणे.. आपले पंतप्रधान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला गेले. तेंव्हा देशाची अस्मिता कुठे गहाण ठेवली होती ?
2019 पुलवामा वरील अतिरेकी हल्ल्याच् पुढे काय झाले ..? तत्कालीन देविंदर सिंह दोन अतिरेक्यांसह पकडला, त्याचे पुढे काय ..? पुलवामा हल्ल्याची जबाबदारी का निश्चित केली गेली नाही..?
 देशातील कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना देशोधडीस लावून .. पाकीस्तान कांदा आयातीस परवानगी कुणी दिली ..? या सर्व घटनांमुळे.. वास्तविक कोण निवडुन आल्याने पाकिस्तानात आंनंद साजरा केला जाईल ..? हे सुस्पष्ट आहे.. त्यामुळे मोदींच्या भाजपची देश – निष्ठा पाकिस्तान व चिन बाबत ऊधडी पडली असल्याचे प्रतिपादनही गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परीषदेत ( Pune)  केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.