Distance Education : विदेशात राहून भारतातील दूरस्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास बंदी 

एमपीसी न्यूज – मुक्त आणि दुरुस्त अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही परदेशी ( Distance Education )विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. यूजीसीने दिलेल्या नियमावलीनुसार, भारतात राहणारेच मुक्त आणि दुरुस्त अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र आहेत. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

यूजीसीच्या मुक्ता आणि दूरस्थ, ऑनलाइन अभ्यासक्रम नियमावली 2020 मध्ये प्रवेश पात्रता नमूद करण्यात आली आहे. देशातील कोणत्याही भागात राहणारा विद्यार्थी युजीसीच्या मान्यता प्राप्त उच्च शिक्षण संस्थेतील मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांतर्गत कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी संस्थेतील प्रादेशिक कार्यक्षेत्रातील असणे आवश्यक आहे.

तसेच फ्रेंचाइज शिक्षण संस्थेतर्फे चालवले जाणारे कॅम्पस, मुक्त विद्यापीठांच्या दूरस्थ अभ्यासक्रमांच्या अभ्यास केंद्र, शैक्षणिक संस्थांचे प्रसार अभ्यासक्रम आणि नियामक मान्यते शिवाय राबवले जाणारे अभ्यासक्रम यासाठी विद्यार्थी व्हिसा दिला जाणार नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यूजीसी नियमावली 2020 नुसार भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक अधिकार क्षेत्राची पूर्तता करून मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार ( Distance Education ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.