Loksabha Election 2024 : राज्यात दुसरा टप्प्यात 62.71 टक्के मतदान; मागील वेळेपेक्षा कमी मतदान 

एमपीसी न्यूज – देशात लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील (Loksabha Election 2024) मतदान 26 एप्रिल रोजी पार पडले. दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 88 जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेश होता. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदान झाले. देशभरात मागील निवडणुकीपेक्षा दोन्ही टप्प्यात कमी मतदान झाले.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 62.71 टक्के मतदान झाले आहे.

Akurdi : यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या शुभम थिटेचा पीसीसीओई मध्ये सत्कार

यावेळी पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 102 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये 65.50 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सन 2019 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 91 जागांसाठी 69.43 टक्के मतदान झाले होते. सन 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत दोन टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरला.

मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी झाला. यात 88 जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 66.70 टक्के असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यात 95 मतदार संघात मतदान झाले होते. त्यावेळी 69.64 टक्के मतदान (Loksabha Election 2024) झाले होते.

दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी –

वर्धा : 64.85 %

अकोला : 61.79 %

अमरावती : 63.67 %

बुलढाणा : 62.03 %

हिंगोली : 63.54 %

नांदेड : 60.94 %

परभणी : 62.26 %

यवतमाळ-वाशिम : 62.87 %

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.