Thergaon : कॅन्सर रूग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे कॅन्सर ( Thergaon ) रूग्णालय पीपीपी (पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप) तत्त्वावर उभारण्यात येणार असून याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

गेल्या काही वर्षांत कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, रुग्णांसाठी उपचाराची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात सोय उपलब्ध नाही. त्यामुळे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. शहरातील गोरगरीब कॅन्सरग्रस्त रुग्णांना अल्प दरात उपचार मिळावेत, या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे एक पथक सुरत शहरातील पीपीपी तत्त्वावर सुरू असलेल्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

Pune : माझ्याकडून संस्कृत आणि धार्मिक गायन झाले याचे मनस्वी समाधान- रवींद्र साठे

थेरगाव येथील रुग्णालयाच्या जवळ 35 गुंठे जागा आहे. या जागेत पीपीपी तत्त्वावर 60 बेडचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यासाठी निविदेची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. निविदा झाल्यापासून दीड ते दोन वर्षांत रुग्णालय उभारण्याचा मानस वैद्यकीय विभागाचा आहे. रुग्णालय झाल्यानंतर महापालिका ठरवून देईल, त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

 

त्यासाठी चार ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. परिणामी, कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची प्रक्रिया रखडली आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय विभागाच्या वतीने सांगण्यात ( Thergaon ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.