Crime News : महिला आमदारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला पकडले

एमपीसी न्यूज –  चारा महिला आमदारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बंटी, बबलीला बिबवेवाडी पोलिसांनी पकडले आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी सायबर पोलीस (Crime News) ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

याप्रकरणी मुकेश राठोड, (रा. वसंत नगर, किनगाव जट्टू, ता. लोणार, जि. बुलढाणा) व सुनीता क्षीरसागर, (रा. गल्ली नंबर 11, प्लॉट नंबर 2631, जय भवानीनगर, औरंगाबाद) या दोन आरोपींना ताब्यात (Crime News) घेतले आहे. 12 जुलैला आमदार माधुरी मिसळ यांना फोन करून एका व्यक्तीने त्याचे नाव मुकेश राठोड सांगून म्हणाला की ,त्याची आई बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून तिच्या औषधोपचाराकरिता पैशाची गरज आहे. त्यासाठी 3,400 रुपये गुगल पे नंबर देऊन त्यावर पाठविण्यास सांगितले.
मिसाळ यांनी मदतीच्या भावनेने आरोपीने दिलेल्या गुगल पे नंबर वर 3,400 रुपये 12 जुलैला त्यांच्या मुलीला पाठविण्यास सांगितले व तिने ते पाठवले.

 

 

Pune Congress : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

 

मिसाळ या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या असता त्यांचे सहकारी आमदार देवयानी फरांदे, मेघना साकोरे- बोर्डीकर व श्वेता महाले यांनासुद्धा आरोपी मुकेश राठोड (Crime News) याने फोन केले. अशाच प्रकारचे कारण सांगून पैशांची मागणी करून त्यांचीसुद्धा फसवणूक केल्याचे समजले. त्यामुळे मिसाळ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
या  गुन्ह्याचे विश्लेषण करून फोन करणारी व्यक्ती ही मुकेश राठोड व गुगल पे नंबरचेधारक सुनीता क्षीरसागर असल्याचे पोलिसांना समजले.

 

 

 

 

आरोपींच्या शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली व एक एक बुलढाणा व एक पथक औरंगाबाद येथें पाठविण्यात आले. त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस (Crime News) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.