Happy News : गणेशोत्सव, दहीहांडी यंदा निर्बंधमुक्त; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ब्रेक लागलेल्या दहीहांडी आणि गणेशोत्सवाला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधांच्या विघ्नात अडकलेला दहीहांडी आणि गणेशोत्सव (Happy News) धुमधडाक्यात साजरा होणार आहे.यंदा गणेशोत्सव आणि दहीहांडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही.

 

Pune Congress : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

 

 

गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बध असल्याने राज्यात दहीहांडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव (Happy News) साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे एक वेगळा उत्साह या वर्षी पाहयला मिळणार आहे.

 

 

 

 

राज्यात यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागास वाहतूक (Happy News) नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. प्रमुख महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनीही सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.