Chikhali News : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पोस्ट ऑफिस’ आपल्या दारी उपक्रम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार महेशदादा लांडगे युवा मंच चिखली यांच्यावतीने कुदळवाडी परिसरात ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ या उपक्रमाचे (Chikhali News) आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिली.

Crime News : महिला आमदारांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला पकडले

 

या उपक्रमात अपघात विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत बाल आधार, पोस्टाचे मोफत बॅंक खाते, आधार मोबाईल लिंकींग ह्या  योजना राबविण्यात येणार आहेत. ठिकाण कुदळवाडी श्री विठ्ठल मंदिरजवळ शिवसाई पतसंस्था येथे तारीख 22 व 23 जुलै, वेळ सकाळी 10ते 5 असणार आहे. 399 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा, अपघाती मृत्यु – 10 लाख, कायमचे अपंगत्व – 10 लाख, दवाखाना खर्च – 60 हज़ार रुपये, (Chikhali News) मुलांच्या शिक्षणाचा खर्च -1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलांना संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत),  अॅडमिट असेपर्यंत रोज 1000 रुपये (10 दिवस), OPD खर्च – 30000, अपघाताने पॅरालीसीस झाल्यास 10 लाख,  कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25000 आणि वेटिंग पीरीयड नाही अशा लाभदायी योजनांची माहिती दिली जाणार आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.