Pune Crime News : ‘ओएलएक्स’वर सोफा खरेदीचे आमिष दाखवत महिलेची दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सोफा खरेदी करण्याचे आमिष दाखवत एका महिलेला ओएलएक्सवरून रक्कम अदा करण्यासाठी क्यूआरकोड पाठवून 1 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विपीनकुमार नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सिंहगड रोड परिसरात राहतात. त्यांनी त्यांच्या घरातील सोफा विक्रीसाठी ओलएएक्सवर टाकला होता. त्यावेळी आरोपीने त्यांना फोन करून सोफा खरेदी करायचा असून, वानवडी भागात माझे फर्निचरचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि फर्निचर विक्रीस होकार दिला. त्यावेळी आरोपीने त्यांना एक क्यूआरकोड पाठविला. सोफ्याची रक्कम पाठविण्यासाठी तो स्कॅन करण्यास सांगितला. तो क्यूआरकोड स्कॅन केल्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून पैसे कमी झाले.

याबाबत फिर्यादी यांनी आरोपीला फोन करून त्यांचे पैसे खात्यातून कमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीने पुन्हा क्यूआरकोड पाठवला व तो पुन्हा स्कॅन करण्यास सांगितला. अशा दोन वेळा आरोपीने खात्यामधून 1 लाख 42 हजार रुपये मोबाईल बँकिंगव्दारे काढून घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.