Pune : मोदी सरकारच्या काळात महिलाचे सबलीकरण व सशक्तीकरण झाले – रुपाली चाकणकर 

एमपीसी न्यूज – मोदी सरकारने देशातील महिलांसाठी राबविलेल्या योजनांमुळे ( Pune ) महिलांचे सबलीकरण, सशक्तीकरण आणि आर्थिक सक्षमिकरण झाले आहे,  असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी माजी उपमहापौर सुनिता वाडेकर, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी सुदर्शना त्रिगुणाईत, पुष्कर तुळजापुकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.

Pune : शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध – मुरलीधर मोहोळ

चाकणकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मागील दहा वर्षात झाली आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये गॅस कनेक्शन पोहचवले.  महिलासाठी विविध साह्य करणार्‍या योजना देशभरात सुरू झाल्या आहे. महिला कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ योजना, लेक लाडकी योजनाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी पाठबळ दिले गेले. चौथ्या महिला धोरणा नुसार महिलेचे नाव पाल्यांच्या नावापुढे दिले गेले हा महिलांचा सन्मान आहे.

मध्यमवर्गीय कुटुंब आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोदी सरकारची धोरणे अतिषण मोलाची आहेत. राज्य सरकाने सुध्दा महिलांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाटबळ मिळाले. राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली.   राज्य महिला आयोगमध्ये काम करताना मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलें. त्यात दीड वर्षात अतिशय कडक कायदे करुन चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्याचे काम ( Pune ) करण्याचे आल्याचे त्या म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.