Pune : शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – आयटी हब असलेल्या हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प ( Pune) अतिशय महत्त्वाकांक्षी असून, त्यामुळे नागरिकांना वेगवान, सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार असल्याचा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

शिवाजीनगर गावठाण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, दत्ता खाडे, आदित्य माळवे, रविंद्र साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, किरण ओरसे, डॉ. अजय दुधाने, हेमंत डाबी, अपर्णा कुऱ्हाडे, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, दयानंद इरकल, आकाश रेणुसे, संजय तुरेकर यांचा प्रचार फेरीत प्रमुख सहभाग होता.

Chakan : सराफ दुकानातील कामगाराने पळवले पावणे आठ लाखांचे दागिने

मोहोळ म्हणाले, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत पीएमआरडीए सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 23.3 किलोमीटर असून या मार्गावर स्थानकांची संख्या 23 इतकी आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर, औफ्लध, गणेशखिंड, खैरेवाडी, शिवाजीनगर आदी भागांना एकमेकांशी जोडणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात हडपसर व लोणी काळभोरपर्यंत विस्ताराची योजना आहे. सध्या प्रकल्पाचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून, मे 2025 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार आहे.

गावठाणातील रोकडोबा मंदिरापासून प्रचार फेरीचा प्रारंभ झाला. परिसरातील गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. शिवाजीनगर गावठाण, राष्ट्रवादी भवन, तोफखाना, जंगली महाराज रस्ता, गोखले स्मारक चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्तामार्गे ज्ञानेश्वर पादुका चौकात प्रचार फेरीची सांगता (Pune) झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.