Thane : काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचे नाव देण्यास विरोध केला – नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

धर्मवीर-2 चित्रपटातून अजून बरेच काही महाराष्ट्रातील जनतेला समजेल

एमपीसी न्यूज : ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे की, “काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देणार होतो, पण एका कलाकाराचे नाव द्या(Thane) असा आदेश आल्यामुळे आनंद दिघे यांचे नाव आम्हाला नाट्यगृहाला देण्यात आले नाही”.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे.

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर हे नाट्यगृह प्रसिद्ध असून अनेक नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात होतात. यावरुन नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत म्हटले आहे की, “काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचा नाव देणार होतो पण आदेश आला की एखाद्या प्रसिद्ध कलाकाराचे नाव द्यावे. म्हणून काशिनाथ घाणेकर यांचे नाव या नाट्यगृहाला(Thane) देण्यात आले”.

 

Pimpri : श्रीरंग बारणे यांच्या मध्यवर्ती प्रचार कचेरीचे गोविंदा यांच्या हस्ते उद्घाटन, पिंपरी येथे रोड शो

आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती देखील करु देत नव्हते,असाही आरोप ठाकरे गटावर नरेश म्हस्के यांनी केला आहे.

यावर त्यांनी म्हटलं की, ‘मला दिघे साहेबांच्या जीवनपटावर चित्रपट काढून देत नव्हते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिघे साहेबांचा चित्रपट काढण्यात आला. म्हणून हा चित्रपट काढायला वेळ लागला. त्यातही विशेष म्हणजे, आनंद दिघे यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला चित्रपट उद्धव ठाकरे अर्धा पाहूनच निघून गेले. आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला अजून बरंच काही कळणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन विचारे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचे कळते. या दोघांपैकी कोण जिंकेल हे आता महाराष्ट्रातील जनतेला 4 जूनला म्हणजेच मतदानमोजणीच्या दिवशीच समजेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.