Chakan : सराफ दुकानातील कामगाराने पळवले पावणे आठ लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज –  सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने (Chakan) सात लाख 77 हजार 721 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 20 नोव्हेंबर 2023 ते 23  एप्रिल 2024 या कालावधीत चाकण मधील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली.

 

सुनील बबनराव अडाणी (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुशील रामनिवास सोनी (वय 39, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा फिर्यादी सोनी यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याने दुकानातील सात लाख 77 हजार 721 रुपये किमतीचे 92.570 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.