Bhosari Crime : मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

0

एमपीसी न्यूज – मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी भोसरी येथे घडली.

पहिल्या घटनेत मानसिंग संजिवनसिंग चौहाण (वय 49, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 17) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजूसिंग गंगाप्रसाद चौहाण (वय 35), शशिकांत महेंद्र चौहाण (वय 32), नवनाथ जाधव (सर्व रा. धावडेवस्ती, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी राजूसिंग आणि शशिकांत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी मानसिंग हे घरी असताना आरोपी त्यांच्या वर्कशॉपवर आले. त्यांनी व्यवसायाच्या कारणावरून “तुझे गॅरेज खूप चालते, तू खूप कमाऊ लागलास, तुझ्याकडे खूप गाड्या येतात म्हणून आम्हाला खूप त्रास होतो’, असे म्हणून फिर्यादी यांना दमदाटी करून हाताने मारहाण केली.

याच्या परस्पर विरोधात राजूसिंग गंगाप्रसाद चौहाण (वय 35, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. अजय मानसिंग चौहाण (वय 20), संजय मानसिंग चौहाण (वय 22), आकाश सोनावणे, सुरेश पाटील, राहुल चव्हाण, चिन्मय कदम व त्याचे इतर मित्र (सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय आणि संजय यांच्या वडिलांना केलेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून सोमवारी (दि. 16) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना लोखंडी रॉडने डोक्‍यात मारहाण करून जखमी केले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III