Bhosari : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकी, मोबाईल केला लंपास

एमपीसी न्यूज – तुम्ही खूप दारू पिलेले (Bhosari) आहात. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असे म्हणून एका व्यक्तीला निर्जन ठिकाणी नेले. तिथे व्यक्तीची दुचाकी आणि मोबाईल फोन काढून घेत त्याचा अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री बारा वाजताच्या सुमारास गोडाऊन चौक, भोसरी येथे घडली.

पंकज सुधाकर धोडरे (वय 31, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksabha Election 2024 : स्थलांतरीत कामगारांच्या मतदानावरही प्रशासनाचे लक्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज हे दारूच्या नशेत गोडाऊन चौक, भोसरी येथे आले. तिथे त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला पत्ता विचारला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने पंकज यांना ‘तुम्ही खूप दारू पिलेले (Bhosari) आहात. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पंकज यांना त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 34/सीई 1602) निर्जन ठिकाणी नेले. तिथे पंकज यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी आणि 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घेऊन जात त्याचा अपहार केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.