Loksabha Election 2024 : स्थलांतरीत कामगारांच्या मतदानावरही प्रशासनाचे लक्ष

एमपीसी न्यूज : – स्थलांतरित कामगारांनी (Loksabha Election 2024) मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी निवडणूक विभाग आणि प्रशासनाने तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने कमी मतदान असलेल्या मतदान केंद्राबाबत सूक्ष्म नियोजन करावे आणि स्थलांतरीत कामगारांचे मतदान सुलभ होईल यासाठी कृतीयोजना तयार करावी, अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, उपायुक्त समिक्षा चंद्राकार, बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

कविता द्विवेदी म्हणाल्या, मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमावर अधिक भर द्यावा. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मतदानाबाबत माहिती द्यावी, यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी. वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना (Loksabha Election 2024) सुलभपणे मतदान करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

Bawdhan Budruk: पैसे परत करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक 

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निश्चित करून त्याची माहिती सादर करावी. अशा मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा असतील आणि अत्यंत सुलभपणे मतदान होईल अशी व्यवस्था करावी, असेही श्रीमती द्विवेदी म्हणाल्या.

यावेळी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण, टपाली मतदान, सुरक्षा व्यवस्था आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय समन्वयक अधिकाऱ्यांनी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share