Bawdhan Budruk: पैसे परत करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – ऑनलाईन मागवलेला ग्लास डिफेक्ट आल्याने (Bawdhan Budruk)त्याचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची साडेचार लाखांची फसवणूक केली. ही घटना 3 मार्च रोजी बावधन बुद्रुक येथे घडली.
फॅशन केप इकार्ट कस्टमर केअर नंबर 08002089898 आणि 07371942485 धारकाच्या (Bawdhan Budruk)विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना फेसबुकवर फॅशन केप इकार्ट चष्म्याची जाहिरात दिसली. जाहिरात पाहून त्यांनी ऑनलाईन दोन ग्लास मागवले. त्यात एक ग्लास फिर्यादीस डिफेक्ट आला. त्यामुळे फिर्यादी यांनी फॅशन केप इकार्ट कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला.

 

त्यांचा फोन दुसऱ्या नंबरवर जोडण्यात आला. अनोळखी नंबर धारकाने फिर्यादीस एनी डेस्क नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून चार लाख 50 हजार 500 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.