Pimpri Chinchwad RTO : मार्चअखेर सुट्टीच्या दिवशीही आरटीओ कार्यालय सुरू राहणार

एमपीसी न्यूज – नवीन वाहन नोंदणी (Pimpri Chinchwad RTO) आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार (दि. 29) ते रविवार दि. 31 मार्च) पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी याबाबत माहिती दिली. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील महसूली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील आरटीओ कार्यालय सुरु ठेवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

RTO : जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी 39 लाख रुपये महसूल जमा

त्याअनुषंगाने गुड फ्रायडे (दि. 29 मार्च), शनिवार (दि. 30 मार्च) व रविवार (दि. 31 मार्च) या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व (Pimpri Chinchwad RTO) त्याअनुषंगीक करवसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभागाचे (महसूल जमा होणारे कामकाज) कामकाज कार्यालयीन वेळेत सुरु राहणार असल्याचेही आदे यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.