Chinchwad : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज सोमवारी राहणार बंद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील (Chinchwad) योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज सोमवारी (दि.26) बंद राहणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यलयाने दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ या कार्यक्रमाचे मोशी येथील पुणे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर येथे 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाकरिता पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची योग्यता प्रमाणपत्राच्या कामकाजाची जागा अधिग्रहीत करण्यात आल्याने सोमवारी (दि.26) वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज होणार नाही.

Pimpri : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च तरीही पादचारी रस्त्यावरच

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरीता सोमवारी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी (Chinchwad) त्यांची वाहने शनिवार दि.2 मार्च रोजी तपासणीसाठी सादर करावीत, असे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.