Pune : पुणे महापालिकेच्या तिजोरीत एप्रिल अखेर पर्यंत अडिचशे कोटींचा मिळकत कर भरणा

एमपीसी न्यूज – एप्रिल आणि मे महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी ( Pune ) आमचे प्रयत्न सुरु आहेत. आज (ता. 26) पर्यंत 1 लाख 77 हजार 485 नागरिकांनी 253 कोटी 45 लाख रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला आहे. आणखी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असून, यामध्ये पुणेकरांकडून कर भरणा मोठ्या प्रमाणात होईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.

पुणे महापालिकेतर्फे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 25 हजारापर्यंत मिळकतकर असणाऱ्या नागरिकांना 10 टक्के, तर त्यापेक्षा जास्त रकमेचा मिळकतकर असल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकतकरावर 10 टक्क्यापर्यंत सूट असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 26 दिवसात 253 कोटी 45 लाख रुपये जमा झाले आहेत. या दोन महिन्यात एक हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.

Chinchwad : चिंचवडमध्ये बारणे यांना दोन लाखांचे मताधिक्य मिळेल – शंकर जगताप

2024-25 च्या अर्थसंकल्पात मिळकतकरातून 2 हजार 549  कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निवासी मिळकतकर या दोन महिन्यात भरणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 50 हजार नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत पोस्टाने हे बिल नागरिकांना मिळतील. तसेच एसएमएस, इमेलद्वारे देखील बिल पाठविण्यात आलेले ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.