Chakan : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज –   पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला ( Chakan) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25 ) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.

भरत तुकाराम जैद (वय 30, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी – बारणेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रोडवर कडाचीवाडी येथे एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भरत जैद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा 50 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चाकण पोलीस तपास करीत ( Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.