Hinjawadi: पेन्शन अकाउंट ऑनलाईन करण्यास सांगत 28 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज – पेन्शन अकाउंट ऑनलाईन करण्यास सांगत एका व्यक्तीची 28 लाख (Hinjawadi)रुपयांची फसवणूक केली. ही घटना 11 ते 13 मार्च या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Hinjawadi)आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना दिनानाथ दीक्षित या नावाने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो कोल इंडिया कंपनीत अधिकारी असून त्याचे पेन्शन अकाउंट ऑनलाईन करायचे आहे, असे सांगितले.
RTO : जप्त वाहनांच्या ई-लिलावाद्वारे एकाच दिवशी 39 लाख रुपये महसूल जमा
त्यासाठी फिर्यादीचे व्हाटसअप आरोपीने त्यच्या मोबाईल सोबत शेअर करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 28 लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=4g1hz-iNMqk&t=1s&ab_channel=MPCNews