Wakad : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक 

एमपीसी न्यूज –  गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी ( Wakad ) पथकाने हिंजवडी परिसरात एक कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली.

वर्धाराम पोमाजी चौधरी (वय 37, रा. भूमकर वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval LokSabha Elections 2024 : आत्तापर्यंत मोदी कारकिर्दीचा ट्रेलर, यापुढे खरा चित्रपट – प्रशांत ठाकूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर वस्ती येथे एकजण गुटखा विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वर्धाराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि मोबाईल फोन असा एकूण 17 हजार 722 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ( Wakad ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.