Maval LokSabha Elections 2024 : चार तपासणी नाक्यांवर चोवीस तास करडी नजर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आदर्श ( Maval LokSabha Elections 2024) आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी सांगवी नाका, वाकड, काळा खडक व मुकाई चौक या चार ठिकाणी एकूण 12 स्थिर सर्व्हेक्षण पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके तीन पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत असून त्यांच्यामार्फत अवैध रोकड, अंमली पदार्थ मद्य, हत्यारे यांना प्रतिबंध करण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे.

 

Pune : पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा ; चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार 

नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय सहा भरारी पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत. या पथकामध्ये प्रत्येकी एक दंडाधिकारी, एक पोलीस उप निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांचा समावेश आहे. निवडणूक लढवणा-या  उमेदवारांमार्फत घेण्यात येणा-या  परवानगी प्राप्त प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा यांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी  एकूण पाच VST (Video Srrveillanbe Team) स्थापन करण्यात आली आहेत.

आचारसंहितेच्या अनुषंगाने करण्यात आलेली भाषणे तपासणे, उमेदवारामार्फत प्रचार सभा, पदयात्रा, मेळावे, कोपरा सभा दरम्यान वापरण्यात आलेले प्रचार साहित्य, वाहने, भोजन व्यवस्था व कार्यक्रमासाठी आवश्यक बाबींची आकडेवारीचा अहवाल विहीत नमुन्यात सहाय्यक खर्च निरीक्षक यांना पाठविला जात ( Maval LokSabha Elections 2024) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.