Pimpri : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची पिंपरीत निदर्शने

एमपीसी न्यूज – कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष (Pimpri )आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  ईडीकडून  अटक केल्याच्या निषेधार्थ पिंपरी- चिंचवड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आज (बुधवारी) आंदोलन करण्यात आले.

इंडिया आघाडीचे समन्वयक मानव कांबळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम,(Pimpri )राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सचिन भोसले, सुलभा उबाळे, अनिता तुतारे, आपचे चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, मीना जावळे, गणेश दराडे, अनिल रोहम, बी. डी. यादव,  सिद्धिक शेख, प्रविण कदम सहभागी झाले होते.

Loksabha Election 2024 : स्थलांतरीत कामगारांच्या मतदानावरही प्रशासनाचे लक्ष

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आणि महायुतीचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे सूडबुद्धीने इंडिया आघाडीतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. त्यातूनच केजरीवालांना अटक, काँग्रेसची बँक खाती गोठवून इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीच्या विजयापासून रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा करत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन घेतल्याचे इंडिया आघाडीचे पिंपरी-चिंचवड समन्वयक मानव कांबळे यांनी संगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.