Loksabha Election 2024 : भाजपची सातवी यादी जाहीर; अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024 ) भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. त्या या आधी अपक्ष खासदार होत्या. भाजपने आपल्या सातव्या यादीत लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपने अमरावती (एससी) मतदारसंघातून अपक्ष खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे, तर कर्नाटकातील चित्रदुर्ग (एससी) मतदारसंघातून डोविंद कर्जोल यांना उमेदवारी दिली आहे.

Pimpri : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची पिंपरीत निदर्शने

नवनीत राणा हे अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्या भाजपच्या समर्थक होत्या. एप्रिल 2022 मध्ये मुंबई पोलिसांनी (Loksabha Election 2024) नवनीत राणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या सकट त्यांच्या पतीला अटक करण्यात आली होती. त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटातही काम केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.