Pimpri: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील कला शाखेच्या(Pimpri) पदव्युत्तर (एम. ए.)च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच मराठी साहित्यातील आद्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या कार्यालयास भेट देऊन संस्थेचे कार्य, उद्दिष्टे आणि उपक्रम जाणून घेतले.

याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष विनीता ऐनापुरे, (Pimpri)जयश्री श्रीखंडे, किरण जोशी आदी उपस्थित होते.

 

Raigad: चैत्र पौर्णिमेला शिवपुण्यतिथी निमीत्त रायगडावर दीपवंदनेद्वारे महाराजांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पांडुरंग भोसले आणि प्रा. संग्राम गोसावी यांच्या अधिपत्याखाली अकरा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने म.सा.प.च्या पदाधिकाऱ्यांशी विविध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला आणि सविस्तर चर्चा केली.

 

यावेळी राजन लाखे यांनी आजपर्यंत झालेल्या प्रकल्पांची तसेच उपक्रमांची सखोल माहिती दिली; तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेचे भविष्यकालीन उपक्रम आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सुरू असलेल्या अथक प्रयत्नांविषयी विस्तृत ऊहापोह केला. जयश्री श्रीखंडे यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.