Pune: 150 पेक्षा जास्त घरफोडी करणारा सराईत जेरबंद, 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – 150 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी (Pune)अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जयवंत उर्फ जयड्या गो‌‌‌वर्धन गायकवाड (वय 38, रा. डॉ. आंबेडकर वसाहत, ओैंध) असे (Pune)अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गायकवाड याच्याविरुद्ध घरफोडीचे 150 हून जास्त गु्न्हे दाखल आहे.

 

LokSabha Elections 2024 : शहरातील ‘या’ 66 ठिकाणी घेता येणार जाहीर सभा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मध्यभागात झालेल्या घरफोडीचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. गायकवाडने घरफोडी केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, सहायक फौजदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयूर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात यांनी ही कारवाई केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.