Pune: मुरलीधर मोहोळ आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज -पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Pune)आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याआधी मुरलीधर मोहोळ यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. यावेळी मोहोळ यांनी आई-वडिलांचे आशीर्वादही घेतले आहेत.

मुरलीधर मोहोळ यांच्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा(Pune) होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Talegaon Dabhade : महिंद्रा ऑटो स्टील कंपनीची ॲड्. पु. वा. परांजपे शाळेला मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेणार आहेत. या सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.