Talegaon Dabhade : महिंद्रा ऑटो स्टील कंपनीची ॲड्. पु. वा. परांजपे शाळेला मदत

एमपीसी न्यूज – चाकण येथील महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड (Talegaon Dabhade)कंपनीच्या सीएसआर फंडातून तळेगाव दाभाडे येथील ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिरात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन देण्यात आले. याचे उद्घाटन व हस्तांतरण समारंभ बुधवारी (दि.२४) पार पडला. कंपनीकडून वर्षभर विविध शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविले जातात.
ॲड्. पु.वा.परांजपे विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे (Talegaon Dabhade)सहसचिव नंदकुमार शेलार यांच्या दुरदर्शी नेतृत्वाखाली शाळेची प्रगती होत आहे.त्यांच्या उपक्रमशीलतेला प्रतिसाद म्हणून महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड, चाकण कंपनी मार्फत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन देण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर होते. सीनियर एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल  दिनेश भोसले,बाबाराजे ढाकणे व एक्झिक्यूटिव्ह कमर्शिअल मंगेश जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन करण्यात आले.सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व डिस्पोजल मशीन उद्घाटन व हस्तांतरण संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड्. पु.वा.परांजपे विद्यामंदिराच्या पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी शाळेचा ऐतिहासिक वारसा त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात शाळेने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम, शाळेतील भौतिक सुविधा, त्याचप्रमाणे शाळेचा उंचावत जाणारा यशाचा आलेख इ. विषयी माहिती देत महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेऊन केलेल्या भरीव मदतीबद्दल ऋण व्यक्त केले त्याचप्रमाणे भविष्यकाळात देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
महिंद्रा ऑटो स्टील प्रायव्हेट लिमिटेड चाकण कंपनीचे हेड कमर्शिअल प्रसाद पादीर यांनी आपल्या मनोगतातून कंपनीच्या सी एस आर फंडातून ग्रामीण भागातील विविध ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,  वृक्षारोपण आदी कंपनी मार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.कंपनीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशालेच्या वतीने शाल बुके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले.आभार ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती दुर्गा भेगडे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.